esakal | बोकडाचं हाड आणि कुटुंबात झगडा, कारण वाचाल तर हैराण व्हाल..
sakal

बोलून बातमी शोधा

बोकडाचं हाड आणि कुटुंबात झगडा, कारण वाचाल तर हैराण व्हाल..

बोकडाचं हाड आणि कुटुंबात झगडा, कारण वाचाल तर हैराण व्हाल..

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई: सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुरू असलेल्या कार्यक्रमात एका कुटुंबामध्ये चांगलीच हाणामारी झालीये. मुंबईच्या भिवंडीतील पूर्णा इथे हा प्रकार घडलाय. राठोड या कुटुंबामध्ये ही हाणामारी झालीये. सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी बोकडाचे हाड अपर्ण करण्याची प्रथा राठोड कुटुंबामध्ये आहे. याचदरम्यान बोकडाचं हाड देण्याचा मान कोणाचा असेल यावरू या कुटुंबात वाद झाला.

मोठी बातमी "कसाबच्या हातात होतं हिंदूंचं पवित्र बंधन" कसाबबद्दल राकेश मारिया म्हणतात...

विशेष म्हणजे या एकाच कुटुंबातील लोकांनी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. ५५ वर्षीय ताराबाई पांडुरंग राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून दीपक हेमलु राठोड, पत्नी कमलीबाई दीपक राठोड, मुलगा गोविंद दीपक राठोड, मुलगा सचिन दीपक राठोड असं या कुटुंबात झालेल्या हाणामारीत गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

नक्की काय घडलं:

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सेवालाल महाराज जयंतीनिमित्त राठोड कुटुंबाची बोकडाच्या हाडाचा मान देण्याची परंपरा आहे. यावर्षी हा बोकडाच्या हाडाचा मान ताराबाई यांच्या सासऱ्यांचा होता. मात्र तरिही गोविंद राठोड याने हा मान स्वत:कडे घेतला. यावरून नाराज झालेल्या ताराबाई यांचा मुलगा लक्ष्मण राठोड गोविंद राठोड याने दिलेले मानाचे हाड गोविंद याच्याकडे परत करायला गेला. याचा राग आल्यामुळे गोविंद राठोड याने ताराबाई यांच्या मुलाला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच ताराबाई यांचे पती पांडुरंग राठोड यांच्या डोक्यावर कमलीबाई राठोड यांनी जेवणाचा डबा आणि तांब्या फेकून मारला. यात पांडुरंग राठोड यांना गंभीर दुखापत झाली आहे. सचिन राठोड यांनीसुद्धा मारहाण केली आणि दीपक राठोड यांनी कमलाबाई यांच्या डोक्यावर तांब्या मारला.

मोठी बातमी -  शाहरुखची मुलगी सुहाना बद्दल करण जोहर म्हणतोय, "कृपया 'त्या' अफवा आता थांबवा..."

या सर्व प्रकरणात राठोड कुटुंबीय किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणात नारपोली पोलिस स्टेशनमध्ये दीपक, कमली, गोविंद आणि सचिन या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

quarrel between family due to offering mutton bone to the god