युवासेनेने दिला भाजपच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांना चोप (व्हिडिओ)

युवासेनेने दिला भाजपच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांना चोप (व्हिडिओ)

मुंबई : युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या विद्यार्थी संघटनेला म्हणजेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना चांगलाच चोप दिला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उपकेंद्र उदघाटन कार्यक्रमात गोंधळ घातला. कल्याण मध्ये आज युवा सेने नेता आदित्य ठाकरे कुलगुरू सुहास पेडणेकर राज्यमंत्री रवींद्र वायकर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राचे उद्धाटन कार्यक्रम सुरू होते. 

आदित्य ठाकरे यांचे भाषण संपल्यानंतर कुलगुरू सुभाष पेडणेकर हे भाषणाला उभे राहिले आणि हॉलमध्ये उपस्थितीतांमध्ये बसलेल्या एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. विद्यापीठाच्या उदघाटनाला राजकीय रंग दिल्याचा आरोप करत घोषणाबाजी केली. या दरम्यान युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली.

दरम्यान, एबीव्हीपी ही विद्यार्थी संघटना भारतीय जनता पक्षाची असून युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना चांगलाच चोप दिल्याने सध्या राजकीय चर्चा चांगल्याच रंगू लागल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com