"हिरकणी'ला स्क्रीन द्या;  नाही तर खळ्‌ऽऽखट्याक 

चित्रपटगृहातील स्क्रीन
चित्रपटगृहातील स्क्रीन

मुंबई : मराठी सिनेमाला स्क्रीन देण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना आक्रमक झाली आहे. "हिरकणी' चित्रपटाला स्क्रीन उपलब्ध न झाल्यास खळ्‌ऽऽखट्याक करण्याचा इशारा अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे.

"हिरकणी' आणि "ट्रिपल सीट' हे मराठी चित्रपट तयार झाले असून, ते प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, अक्षयकुमारच्या "हाऊसफुल-4' या चित्रपटामुळे मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नसल्याने खोपकर यांनी चित्रपटगृहमालकांना पत्र लिहून इशारा दिला आहे. 

प्रसाद ओक दिग्दर्शित "हिरकणी' 24; तर "ट्रिपल सीट' चित्रपट 25 ऑक्‍टोबरला प्रदर्शित होत आहे. मात्र, याचदरम्यान अक्षयकुमारचा "हाऊसफुल 4' हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने मराठी सिनेमाला स्क्रीन मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे मनसेने थिएटरमालकांना पत्र लिहून "तुटेल इतके ताणू नका', असा इशारा दिला आहे.

दर्जेदार मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत; मात्र स्क्रीन उपलब्ध नसल्याचे या निर्मात्यांना सांगण्यात येतेय. महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळणार नसतील, तर मराठी चित्रपट निर्मात्यांनी काय करायचे, असा प्रश्‍न खोपकर यांनी उपस्थित केला आहे. 

सर्व चित्रपटांना संधी देणे हे तुमचे कर्तव्य आहे. तुमची चित्रपटगृहे हिंदीची बटीक नाहीत. हिंदी चित्रपटांसाठी मराठी चित्रपटांवर अन्याय करू नका. महाराष्ट्रात मराठीची अस्मिता जपणे हे आमचे काम आहे. आम्ही सहनशील आहोत; परंतु दुर्बल नाही, हे लक्षात घ्या. मात्र, सामंजस्याची भाषा तुम्हाला समजत नसेल, तर आमच्या भाषेत उत्तर देऊ. 
- अमेय खोपकर, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना  

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com