आनगांवचा पाणी प्रश्न सुटला

 दीपक हिरे
मंगळवार, 5 मार्च 2019

वज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील भिवंडी वाडा रस्त्यावरील मध्यवर्ती बाजार पेठ असलेली आनगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राम शेलार, व उपसरपंच राजाराम राऊत यानी सतत शासन दरबारी येथील पाणी प्रश्न बाबत सतत पाठपुरावा करून अखेर खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने आनगांव ग्रामपंचायतीसाठी निधी उपलब्ध करून घेतला. त्यामुळे या परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

भिवंडी तालुक्यातील सुपरिचित आशा आनगांव या ग्रामपंचायतमध्ये गेले कित्येक वर्षांपासून पाणी प्रश्न भेडसावत होता. आनगांव हे परीसरातील नामांकित गाव असून मध्यवर्ती ठिकाण आहे. या ठिकाणी माध्यमिक शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालय, जि प शाळा, व मोठी बाजारपेठ असल्याने परिसरातील खालींग, पुंडस, चावे, भरे, लाप, मुरे, खंडपे, चिंचवली, धामणगाव, आदी गाव पाड्यातून लोक येथे बाजार हाट करणेसाठी येतात. मात्र या ठिकाणी विहिरीमार्फत पाणी पुरवठा केला जात होता. एप्रिल, मे, जून या महिन्यात मोठी पाणी टंचाई निर्माण होते. त्यासाठी सन 2012 मध्ये आनगांव येथील सरपंच रामचंद्र शेलार, व उपसरपंच राजाराम राऊत यांनी ग्रामपंचायतीमध्ये अनेक वेळा ठराव घेऊन घेऊन कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग ठाणे, तसेच जल अभियंता मुंबई येथे पत्रव्यवहार करून वारंवार पाठपुरावा केला होता. अखेर येथील खासदार कपिल पाटील यांनी या ग्रामपंचायत साठी शासन दरबारी राष्ट्रीय पेयजल योजनेतून  आनगांव साठी 1 कोटी 21 लाख रुपये मंजूर करून तांत्रिक मार्ग मोकळा केला व या पाणी योजनेचा लवकरच काम सुरू होणार आहे. त्यामुळे परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The question of water of Anangaon is solved