वीजबिल भरण्यासाठी लांबच लांब रांगा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 नोव्हेंबर 2016

वडाळा - सरकारी सेवेतील व्यवस्थापनांमध्ये 500 व हजारच्या नोटा स्वीकारण्याची मुदत शुक्रवारी (ता. 11) संपत असल्याने दादर टीटी परिसरातील दादर कार्यशाळा आणि वडाळा बेस्ट आगारातील विद्युत भरणा केंद्रांवर नागरिकांची झुंबड उडाली होती. वीजदेयक भरण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. 

वीजबिल भरण्यासाठी 11 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत 500-हजारच्या नोटा स्वीकारण्यात येणार होत्या. साहजिकच कधी नव्हे ती विद्युत केंद्रांवर गर्दी झाली. लांबच लांब रांगा लागल्याने एका वीजग्राहकाचा नंबर चार-साडेचार तासांनी लागत होता. अनेक जण सरकारच्या निर्णयाविरोधात संताप व्यक्त करीत होते. 500-हजारच्या नोटा जमा करण्याच्या उद्देशानेच सर्व जण आल्याने गर्दी काही कमी होत नव्हती. 

घरातील कामे उरकून दुपारी अडीच वाजता मी वीजबिल भरण्यासाठी आले. सायंकाळचे 5 वाजले तरी नंबर आलेला नाही. सरकारने सर्वसामान्यांची कोंडी होऊ नये, असे निर्णय घ्यायला हवेत. आमचा वेळ वाया जाईल असे निर्णय कशाला, असा त्रागा गृहिणी मंगल सोनावणे यांनी व्यक्त केला. 

Web Title: queue for Electricity bill pay

टॅग्स