कोविड तपासणीसाठी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या रांगा, सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

प्रशांत कांबळे
Friday, 27 November 2020

यादरम्यान वांद्रे स्थानकासह अनेक स्थानकांवर तपासणी करण्यासाठी प्रवाशांची रांगा लागल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. गुजरात, राजस्थान, दिल्ली, गोवा या राज्यातून मुंबईत दाखल होणाऱ्या रेल्वे, विमान सेवेतील प्रवाशांची थर्मल तपासणी आणि आरटीपीसीआर तपासणी केली जात आहे.

मुंबई: राज्य सरकारच्या निर्देशानंतर मुंबई महानगरपालिके मार्फत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, वांद्रे, बोरिवली, मुंबई सेंट्रल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकांवर राज्याबाहेरून येणाऱ्या लांब पल्यांच्या रेल्वेतील प्रवाशांची कोरोना तपासणी केली जात आहे. मात्र, यादरम्यान वांद्रे स्थानकासह अनेक स्थानकांवर तपासणी करण्यासाठी प्रवाशांची रांगा लागल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.

गुजरात, राजस्थान, दिल्ली, गोवा या राज्यातून मुंबईत दाखल होणाऱ्या रेल्वे, विमान सेवेतील प्रवाशांची थर्मल तपासणी आणि आरटीपीसीआर तपासणी केली जात आहे. यासाठी महानगपालिकेचे पथक विविध टर्मिनसवर नियुक्त करण्यात आले आहे. या तपासणीसाठी प्रवाशांना फी आकारल्या जात असून,  प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्यांना कोविड केंद्रात उपचारासाठी दाखल केले जात आहे.

अधिक वाचा-  खासगी रुग्णालयांचाही विशेष ‘पोस्ट-कोविड पुनर्वसन क्लिनिक’ सुरु करण्यावर भर, परळच्या ग्लोबलचा पुढाकार

मात्र, बुधवारी सर्वच स्थानकावर प्रवाशांना ऐनवेळी रांगा लावाव्या लागत असल्याने तासंतास प्रवाशांना स्थानकावरच तात्कळत राहावे लागले आहे. वांद्रे टर्मिनसवर सकाळी 11 ते 11.30 वाजता दरम्यान राजस्थान आणि गुजरात राज्यातून एकाचवेळी लांब पल्यांच्या गाड्या मुंबईत पोहचल्याने प्रवाशांची झुंबड उडाली, त्याचे व्हिडीओ आणि फोटो दिवसभर समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. 

रेल्वे स्थानकावरील कोरोना तपासणी

 

स्थानक एकूण तपासणी केलेले प्रवासी पॉझिटिव्ह प्रवासी
     
सीएसएमटी 1079 0
मुंबई सेंट्रल 3400 0
दादर 2000 1
एलटीटी 315 3
वांद्रे टर्मिनस 2047 5
बोरिवली 938 1
एकूण 9779 10

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Queues passengers railway stations cowardly inspections break social distance


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Queues passengers railway stations cowardly inspections break social distance