राम मंदिराच्या बांधकामासाठी मुंबई भाजपचे 'हे' एकटे नेते देणार एक कोटी रुपये

सुमित बागुल
Saturday, 8 August 2020

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठीही आर एन सिंह यांनी पंतप्रधान मदत निधीमध्ये एक कोटी रुपये पैसे जमा केले आहेत.

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे आमदार आर. एन. सिंह यांनी अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी एक कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले. यासंदर्भात सिंह यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी स्थापन केलेल्या ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांच्याशी बातचीत केली आहे. सिंह म्हणाले की, लवकरच आरटीजीएसच्या माध्यमातून एक कोटींची रक्कम ते राम मंदिर ट्रस्टला देणार आहेत. मुंबईतील भाजप आमदार आर.एन. सिंह सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. ते उत्तर भारतीय संघाचे मुंबईचे अध्यक्ष देखील आहेत. आमदार आर.एन. सिंह सांगतात की, देवाने त्यांना लोकांची सेवा करण्याची संधी दिली आहे आणि म्हणूनच आजपर्यंत सेवा केलेली आहे.

मोठी बातमी : विमान दुर्घटनेची बातमी आली आणि साठे कुटुंबियांच्या पायाखाची जमीन सरकली...

प्रधानमंत्री रिलीफ फंडालाही केली होती 1 कोटीरुपयांची मदत 

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आर एन सिंह यांनी पंतप्रधान मदत निधीमध्ये एक कोटी रुपये पैसे जमा केले आहेत. सोबतच आता अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी एक कोटी रुपये देण्याचीही त्यांनी घोषणा केली आहे. यासंदर्भात त्यांनी सांगितले की, अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी मागील 500 वर्षांपासून संघर्ष सुरू आहे.

मोठी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुन्हा मारली बाजी, 'या' यादीत मिळवलं 'टॉप 5' मध्ये स्थान...

'आपण सर्वांनी मदतीसाठी पुढे यायला हवे'

आर एन सिंह सांगतात की, राम मंदिरासाठी अनेकांनी आपले बलिदान दिले आहे. बरीच प्रतीक्षा केल्यानंतर, मंदिर बांधण्याचं काम आता सुरू झाले आहे, म्हणून आपण सर्वांनी मदतीसाठी पुढे यायला हवं  भव्य राम मंदिर उभारण्यात प्रत्येकाने सहकार्य करायला हवं. नवीन इतिहास बनविला जात आहे ज्यासाठी आपण सर्व साक्षीदार आहोत असंही ते म्हणालेत. 

R N singh mumbi BJP MLA to donate one crore rupees for ram mandir construction


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: R N singh mumbi BJP MLA to donate one crore rupees for ram mandir construction