

Political Buzz in Maharashtra: Who Will Fill Sunetra Pawar’s Rajya Sabha Seat?
sakal
मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी राज्यसभेवर वर्णी लागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची रस्सीखेच लागली. माजी खासदार आनंद परांजपे, सुबोध मोहिते, शिवाजीराव आढळराव पाटील आणि विधानसभा निवडणुकीवेळी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेले संजय पाटील यासाठी इच्छुक आहेत. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे सुद्धा स्पर्धेत आहेत.