
राज्यात मास्क बनवण्याचा परवाना व्हीनस, मॅग्नम आणि थिएँलिसिस या तीन कंपन्यांकडे आहे. या कंपन्यांच्या ब्रँडेड मास्कला बाजारात मोठी मागणी आहे.
मुंबई - कोरोना विषाणुंची लागण होऊ नये यासाठी तुम्ही जर ब्रँडेड कंपनीचे, महागडे मास्क विकत घेत असाल तर ते मास्क एकदा तपासून पाहा. कारण ब्रँडेड कंपन्यांच्या नावावर बनावट मास्कचा गोरखधंदा सध्या मुंबईत सुरु आहे. अशा बनावट मास्क विक्रेत्यांवर कारवाई होत असली तरी ते रोखण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेलं नाही.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क घालणे अनिवार्य असल्याने मास्कची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कुठल्याही प्रकारचा धोका नको म्हणुन अनेकजण ब्रँडेड मास्क वापरतात. त्यामुळे ब्रँडेड मास्कची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ब्रँडेड मास्क हे 250 रूपयांपासून पुढे 1200 रूपयांपर्यांत विकले जातात. याचाच फायदा उचलून ब्रँडेड कंपन्यांच्या बनावट मास्कची विक्री करण्यात येत आहे.
मोठी बातमी - दरवर्षी गिरगाव चौपाटीवर बाप्पाचं विसर्जन करतात? आधी विसर्जनाचा टाइमस्लॉट बुक करा, नाहीतर ऐनवेळी गोंधळ...
राज्यात मास्क बनवण्याचा परवाना व्हीनस, मॅग्नम आणि थिएँलिसिस या तीन कंपन्यांकडे आहे. या कंपन्यांच्या ब्रँडेड मास्कला बाजारात मोठी मागणी आहे. शिवाय या मास्कची किंमत ही अडीचशे रूपयांच्यावर असल्याने या कंपन्यांचे बनावट मास्क बनवले जातायत. बनावट मास्कचा पुरवठा मुंबईतील अनेक दुकानांमध्ये केला जातोय. तर काहीजण ऑर्डर प्रमाणे हे मास्क कंपन्या, कारखाने, मोठ्या सोसायट्यांना पुरवत आहेत. बनावट मास्क बनवणाऱ्या छोट्या कारखान्यांचे यामुळे पेव फुटले असण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने लोअर परळमध्ये ब्रँडेड कंपन्यांच्या नावावर बनावट मास्क विकणाऱ्या टोळीवर धाड टाकून त्यांच्या मुसक्या आवळल्यात. त्यांच्याकडून पोलिसांऩी व्हिनस कंपनीचे पांढऱ्या रंगाचे 10,500 नग, एन 95 मास्क, वॉल्व असलेले पिवळ्या रंगाचे 6,800 नग, व्ही 410 मास्क, अशा विविध प्रकारचा सुमारे 22 लाख रूपयांचा माल जप्त केला. व्हीनस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता हे मास्क बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
मोठी बातमी - सर्वात श्रीमंत महापालिकेत तयार होतोय कॉस्ट कटिंगचा आराखडा, BMC अर्थसंकल्प 12 हजार कोटींनी घटणार?
जप्त केलेला सर्व माल हा निकृष्ट दर्जाचा असल्याचे समोर आले आहे. असे मास्क मोठ्या प्रमाणावर काळ्या बाजारात विकले जातात. यामागे मोठा नफा मिळत असल्याने बनावट मास्कचा काळाबाजार वाढला आहे. मात्र अशा मास्कमुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. शिवाय संसर्गाचा अधिक प्रसारहोण्याची शक्याता आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्याप्रमाणे कोरोना विषाणुंचा मुकाबला करू शकेल असेच मास्क वापरण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.
देशात मास्क वापरण्याबाबात प्रचंड गोंधळ आहे. रूमाल, साधे मास्क, सर्जिकल मास्क किंवा एन95 मास्क याबाबत लोकांमध्ये प्रचंड गोंधळ असल्याचे ऑल फूड अँड ड्रग्स लायसन्स होल्डर फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले. याशिवाय मास्क उत्पादन, विक्री आणि त्यांच्या किंमती यावर देखील सरकारचे नियंत्रण दिसत नाही. त्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचे पांडे यांनी सांगितले.
मास्क ही लोकांसाठी जिवनावश्याक वस्तू झाली असल्याने सरकारने यावर लक्ष देणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचेही ते म्हणालेत.
( संपादन - सुमित बागुल )
racket producing duplicate N95 and branded mask busted by mumbai police