महेतांना तुरुंगात टाकणार का - मुंडे

Dhananjay-Munde
Dhananjay-Munde

मुंबई - मुंबईतील ताडदेवच्या एम. पी. मिल कंपाउंड एफएसआय गैरव्यवहाराचा आरोप करणारे राधाकृष्ण विखे पाटील आता गृहनिर्माणमंत्री झाले आहेत आणि आता ते महेता यांना तुरुंगात पाठवणार का, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केला. राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते.

मंत्रिमंडळातून वगळलेल्या आणि भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप असलेल्या मंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही धनंजय मुंडे यांनी केली. राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांत दिलेले एकही आश्वासन पाळले नाही, राज्यपालांचे अभिभाषण आणि राज्यातल्या वस्तुस्थितीचा काडीमात्र संबंध नाही, असा आरोप मुंडे यांनी या वेळी केला. मुंडे म्हणाले, की भाजपने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा सत्तेवर येण्यापूर्वी केली होती, उत्पन्न दुप्पट झाले नाही, उलट शेतमालाचे भाव पाडण्याचे कटकारस्थान या सरकारने केले, उत्पन्न दुप्पट करण्यासाठी २०२२ चा वादा करून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पुन्हा धूळ फेकण्याचे काम सरकार करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com