रेडिओ सिलोनचे ज्येष्ठ निवेदक गोपाल शर्मा यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 22 मे 2020

रेडिओच्या कार्यक्रमात गुड नाईट ऐवजी शुभ रात्री शब्दप्रयोग प्रतलित करणारे सिलोन रेडिओचे निवेदक गोपाल शर्मा यांचे (89) शुक्रवारी सकाळी बोरीवली येथील निवासस्थानी वृद्धपकाळाने निधन झाले.

मुंबई :  रेडिओच्या कार्यक्रमात गुड नाईट ऐवजी शुभ रात्री शब्दप्रयोग प्रतलित करणारे सिलोन रेडिओचे निवेदक गोपाल शर्मा यांचे (89) शुक्रवारी सकाळी बोरीवली येथील निवासस्थानी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बोरीवली पूर्व दौलतनगर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून,  मुलगी, जावई नातवंडे असा परिवार आहे. 

1956पासून  रेडिओ सिलोनवर गोपाल शर्मा निवेदक म्हणून रूजू झाले. 'आवाज कि दुनिया के दोस्तो '...या गोपाळ शर्मा यांज्या आवाजाने रसिकांच्या मनावर मोहिनी घातली होती. पन्नास, साठच्या दशकात रेडीओ सिलोनला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. 

सर्दी खासी ना कोरोना हुआ ! अरे बापरे 'या' आजाराचा वाहक तुमच्या फ्रिजमध्येच लपून बसलाय...

र्यक्रम सादर करण्याच्या आपल्या अनोख्या शैलीमुळे त्यांनी सिलोन रेडीओला अद्भुत लोकप्रियता मिळवून दिली. गोपाल शर्मा यांनीच 'शुभाशिष', 'शुभरात्री', 'बंधूवर' हे शब्द प्रथम रेडीओवर आणले. त्यांच्या आत्मचरित्राचे नावही 'आवाज की दुनियाके दोस्तो' असे आहे. गोपाल शर्मा हे सतत पाच पाच तास षण्मुखानंदला कार्यक्रमाचे संचालन करायचे. दोन गाण्यांदरम्यान त्यांचा आवाज ऐकणे, ही श्रोत्यांसाठी मोठी पर्वणी होती.  रेडिओ सिलोनवर गोपालजींनी 1967 पर्यंत काम केले. त्यानंतर त्यांनी विविध भारती अंतर्गत रेडिओ कार्यक्रम केले. त्यांची स्वतःची रेडिओ अॅडव्हटायजिंग सर्व्हिस कंपनी होती. गोपालजींच्या निधनाबद्दल श्रोत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Radio Ceylon senior commentator Gopal Sharma passes away