"रईस'चे विशेष गाणे संक्रांतीच्या मुहूर्तावर 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 9 जानेवारी 2017

मुंबई - "रईस' या चित्रपटाच्या ट्रेलरबरोबरच त्याची गाणीही हिट ठरत आहेत. 25 जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातील आणखी एक गाणे मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर 14 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. "उडी उडी...' असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याचे बोल गुजराती असल्याने शाहरूख खान पहिल्यांदाच एका गुजराती गाण्यावर ताल धरताना दिसणार आहे. 

"रईस' चित्रपटातील "लैला मैं लैला' आणि "झालिमा' ही दोन गाणी सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. या चित्रपटात शाहरूख एका माफियाची भूमिका करत आहे. "उडी उडी...' हे गाणे संक्रांतीच्या सणासाठीच खास बनवले आहे. हे संपूर्ण गाणे शाहरूखवर चित्रित झाले असून या गाण्यात त्याच्यासोबत माहिरा खानही आहे. संक्रांतीच्या सणाला पतंग उडविण्याचा खेळ खेळला जातो. गाण्याच्या "उडी उडी' या शब्दांमधूनच हे गाणे या सणासाठी असल्याचे स्पष्ट होते. चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही शाहरूख पतंग उडविताना दिसला आहे. या गाण्यामधील शाहरूखचा गुजराती अंदाज पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुकच आहे. या चित्रपटातून शाहरूख ऍक्‍शन आणि रोमॅंटिक अशा दोन्ही भूमिका साकारत आहे. "रईस'चे दिग्दर्शन राहुल ढोलकियाने केले आहे. या चित्रपटाची निर्मिती एक्‍सेल एन्टरटेन्मेंटची असून, प्रस्तुती रेड चिलीस एन्टरटेन्मेंट आणि एक्‍सेल एन्टरटेन्मेंट यांची आहेत. 

Web Title: raees movie hit song