तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी

Payal-Tadvi
Payal-Tadvi

मुंबई - नायर रुग्णालयातील निवासी डॉक्‍टर पायल तडवी यांच्या आत्महत्येप्रकरणी तिन्ही आरोपी डॉक्‍टरांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी यापूर्वी डॉ. भक्ती मेहर हिला अटक केली होती. त्यानंतर डॉ. हेमा आहुजा व डॉ. अंकिता खंडेलवाल यांनाही अटक करण्यात आली. या तिघींनाही ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर डॉ. भक्ती मेहर मंगळवारी फोर्ट परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती; त्यानुसार तिला अटक करण्यात आली. त्याचप्रमाणे पोलिसांनी डॉ. हेमा आहुजा हिला बुधवारी अंधेरी रेल्वेस्थानकातून अटक केली. डॉ. अंकिता खंडेलवाल हिलाही बुधवारी पहाटे पुण्यातील हिंजवडी परिसरातून अटक करण्यात आली. पोलिसांनी या तिघींचेही मोबाईल जप्त केले आहेत. डॉ. पायल यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली होती का, तसे असल्यास ती चिठ्ठी आरोपींनी नष्ट केली अथवा लपवली आहे का, अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे पोलिस शोधत आहेत. त्याबाबत तिन्ही आरोपी डॉक्‍टरांची चौकशी करण्यात येणार आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एम. सदरानी यांनी तिन्ही आरोपी डॉक्‍टरांना ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com