राहुल गांधी १२ जूनला मुंबई दौऱ्यावर

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 8 जून 2018

मुंबई - काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राहुल गांधी प्रथमच मुंबईत येत आहेत. मंगळवारी (ता. १२) जूनला गोरेगाव येथील बॉम्बे एक्‍झिबिशन सेंटरच्या मैदानात होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्याला ते मार्गदर्शन करणार आहेत. 

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार पाचव्या क्रमांकावर घसरल्यानंतर पक्षात चिंतेचे वातावरण आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नांदेड महापालिका राखली असली तरी त्यांच्याविरोधात काही असंतुष्टांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

Web Title: Rahul Gandhi on the 12 June in Mumbai