

Rahul Gandhi sad on bmc election result
ESakal
मुंबई : राज्यात नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या पक्षाच्या निराशाजनक कामगिरीचा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज आढावा घेतला. एका हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीत महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती तसेच संघटन बळकटीसाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर शिवसेना (युबीटी) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या मित्र पक्षांसोबत आगामी काळात निवडणूक न लढविणे योग्य की अयोग्य यावरसुद्धा विचार मंथन झाल्याचे समजते.