esakal | कोर्ट फी तिकीटांच्या काळ्या बाजारावर धाड
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई : कोर्ट फी तिकीटांच्या 'काळ्या' बाजारावर धाड

मुंबई : कोर्ट फी तिकीटांच्या 'काळ्या' बाजारावर धाड

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : वांद्रे येथील लघुवाद न्यायालयाच्या पुढेच पानटपरी चालकाकडून कोर्ट फी तिकीटांचा काळाबाजार केल्या जात असल्याचे धक्कादायक वास्तव सकाळने मंगळवारी अघड केले होते. त्यानंतर मुद्राक शुल्क विभागाने त्याची दखल घेत, निर्मल नगर पोलीसांच्या उपस्थितीत मुंद्राक निरिक्षक आणि पर्यवेक्षक या अधिकाऱ्यांनी पानटपरी चालकावर कारवाई करून अटक केली आहे.

हेही वाचा: दोन महिन्यांतील कोविड मृत्यूंचा अभ्यास होणार

कोर्ट फी तिकीट आणि रेव्हेन्यु तिकीटीसह कोर्ट फी स्टॅम्प विक्रीसाठी मुद्रांक शुल्क विभागातून अधिकृत विक्रेता नेमण्यात येते, त्याशिवाय इतरांना या तिकीटांचा किंवा स्टँम्पची विक्री करने बेकायदा आहे. त्यानंतरही वांद्रे येथील लघुवाद न्यायालयाच्या पुढे गेल्या अनेक वर्षांपासून कोर्ट फी तिकीट आणि रेव्हेन्यु तिकीटांची चक्क पानटपरी चालक बेकायदा विक्री करत असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर सकाळ च्या प्रतिनीधीने यासंदर्भात स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर हा प्रकार उघड झाला.

त्यामूळे बुधवारी मुंबईच्या प्रधान मुद्रांक कार्यालयातील मुद्रांक निरिक्षक सी आंबेकर आणि अंधेरी येथील मुंद्राक जिल्हाधिकारी कार्यालयातील पर्यवेक्षक प्रसाद गुरूनूळे यांनी पानटपरीवर जाऊन पुन्हा स्टिंग ऑपरेशन पद्धतीने तिकीटांची मागणी केली. दरम्यान 10 तिकीट मागितल्यावर 120 रूपये घेतले तर 5 तिकीटांसाठी 60 रूपयांची मागणी केल्याचे आढळून आल्यानंतर रंगेहाथ पानटपरी चालकाला अटक करण्यात आली. या प्रकरणात पानटपरी चालकाला अटक करून 1965 रूपये किंमतीच्या कोर्ट फी तिकीट आणि 155 रूपयांच्या रेव्हेन्यु तिकीट जप्त करण्यात आल्या आहे.  

बेकायदा तिकीट आल्या कुठून?

मुद्रांक शुल्क विभागाच्या परवानगी शिवाय या तिकीटांची विक्री करता येत नसतांना, पानटपरी चालकाजवळ या तिकीटा आल्याकुठून असा प्रश्न मात्र, अद्याप अनुत्तरीत आहे. त्यामूळे या कारवाईनंतर रंगेहाथ पकडण्यात आलेल्या आरोपीकडून पोलीस त्यांच्या तपासात तिकीट विक्री करणाऱ्या मुळ  विक्रेत्याला शोधून काढतील का ? किंवा मुद्रांक शुल्क विभाग या प्रकरणाच्या खोलात जातील का ? असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जात आहे.

"बेकायदा तिकीट विक्री करणाऱ्या पानटपरी चालकाला रंगेहाथ अटक करण्यात आली असून त्याकडील मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आला आहे."-सतिश देशमुख, अप्पर मुद्रांक नियंत्रक, मुंबई

loading image
go to top