पेणमधील 50 फुटांच्या होळ्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 मार्च 2020

सावरीच्या झाडावर मखर उभारला जातो. मखरामध्ये विद्युत रोषणाई केली जाते. त्यानंतर गावातील नागरिक एकत्र येऊन ही होळी उभी करतात. होळी उभारताना जोरजोरात आरोळ्या देऊन आणि एकमेकांना प्रोत्साहित करून ही होळी युक्ती आणि शक्तीचा पुरेपूर वापर करून उभारली जाते.

अलिबागः कोकणातील होळी हा महत्त्वाचा सण आहे. प्रत्येक जिल्ह्यात आणि जिल्ह्यातील प्रत्येक भागात हा होलिकोत्सव वेगवेगळ्या प्रकारे पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. जिल्ह्यातील पेण तालुक्‍यात होलिकोत्सव 40 ते 50 फूट अशा उंच होळ्या उभारून साजरा केला जातो. त्यामुळे या होळ्या एक आर्कषण ठरत असून, गेल्या अनेक वर्षांपूर्वीची परंपरा आजही या तालुक्‍यात कायम आहे.

महिलेच्या पोटात कोकेन आणि कंडोम
 
सावरीच्या झाडावर मखर उभारला जातो. मखरामध्ये विद्युत रोषणाई केली जाते. त्यानंतर गावातील नागरिक एकत्र येऊन ही होळी उभी करतात. होळी उभारताना जोरजोरात आरोळ्या देऊन आणि एकमेकांना प्रोत्साहित करून ही होळी युक्ती आणि शक्तीचा पुरेपूर वापर करून उभारली जाते. होळी उभी करतानाचा चित्तथरारक क्षण पाहण्यासाठी गावातील ज्येष्ठ नागरिकांसह महिला तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात. अगदी 5 ते 10 फुटांपासून ते 40 ते 50 फुटांपर्यंतच्या आणि आजूबाजूच्या इमारतींच्या उंचीलाही ठेंगणे करतील अशा होळ्या पेण तालुक्‍यातील एक आकर्षण ठरत आहे. 

आबालवृद्धांमध्ये उत्साह 
पेण तालुक्‍यात गेल्या अनेक दशकांपासून या उंच होळ्या उभारण्याची प्रथा सुरू असून, होळी पौर्णिमेच्या 8 ते 10 दिवस आधीपासूनच या होळ्या उभारण्याची तयारी पेणमधील विविध मंडळांची सुरू झाली आहे. तरुणाईसह बच्चे कंपनीही या होळ्या उभारण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यामुळे होळी उभारायचा उत्साह तेवढाच द्विगुणित झालेला असतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad-50 fit holi in pen