खालापूर कोर्ट ए संघ विजेता 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 January 2020

चारही संघांमध्ये स्पर्धा होऊन अंतिम सामना खालापूर कोर्ट "ए' संघ व खालापूर कोर्ट "बी' यांच्यात झाला. यात "बी' संघाकडून 50 धावांचे आव्हान खालापूर कोर्ट "ए' संघासमोर ठेवले.

खोपोलीः खालापूर युवा वकील संघटनेतर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेत खालापूर कोर्ट "ए' संघ विजेतेपदाचा मानकरी ठरला; तर खालापूर कोर्ट "बी' संघाने उपविजेतेपद पटकाविले. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून साळवी भाऊसाहेब, फलंदाज ऍड. सोमनाथ दळवी यांची निवड झाली. सामनावीरचा किताब सह न्यायाधीश धोंडगे यांनी मिळविला. उत्कृष्ट खेळाडू म्हणून ऍड. अभिषेक दुरगुडे, देशमुख भाऊसाहेब यांची निवड करण्यात आली.

फरहान आझमीची उद्धव ठाकरेंना धमकी....

खालापूर न्यायालयातील वकील, न्यायाधीश, कर्मचारी असे एकत्र मिळून चार संघ तयार करण्यात आले. खालापूर कोर्ट "ए' संघाचे नेतृत्व सहन्यायाधीश धोंडगे यांनी केले. खालापूर कोर्ट "बी' संघाचे नेतृत्व ऍड. महेश भद्रिके यांनी केले. खालापूर कोर्ट "सी' संघाचे नेतृत्व ऍड. मनोज पाटील यांनी केले. खालापूर कोर्ट "डी' संघाचे नेतृत्व ऍड. रितेश पाटील यांनी केले.
 
चारही संघांमध्ये स्पर्धा होऊन अंतिम सामना खालापूर कोर्ट "ए' संघ व खालापूर कोर्ट "बी' यांच्यात झाला. यात "बी' संघाकडून 50 धावांचे आव्हान खालापूर कोर्ट "ए' संघासमोर ठेवले. खालापूर कोर्ट "ए' संघाने धावांचा पाठलाग करताना न्यायाधीश धोंडगे व ऍड. सोमनाथ दळवी यांनी तुफान फटकेबाजी करत खालापूर कोर्ट "बी' यांनी दिलेले 50 धावांचे आव्हान चार षटकांमध्येच पूर्ण केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad-advocat-criket

टॉपिकस
Topic Tags: