रायगड कॉंग्रेसचे उमेदवार आज ठरणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रायगड जिल्ह्यातील सातही विधानसभेसाठी कॉंग्रेस पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम गुरुवारी (ता.1) होणार आहेत. या वेळी अनेकांचे भवितव्य निश्चित होणार आहे.

पनवेल : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रायगड जिल्ह्यातील सातही विधानसभेसाठी कॉंग्रेस पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम गुरुवारी (ता.1) होणार आहेत. या वेळी अनेकांचे भवितव्य निश्चित होणार आहे.

हा कार्यक्रम कर्नाळा अभयारण्य परिसरातील क्षणभर विश्रांती हॉटेलच्या जवळील आदित्य व्हिला फार्म या ठिकाणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या निर्देशानुसार हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती रायगड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष, माजी आमदार माणिक जगताप यांनी दिली. जिल्ह्यातील महाड, श्रीवर्धन, अलिबाग, पेण, कर्जत, उरण आणि पनवेल विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी राम हरी रूपनवर व सुरेश कुऱ्हाडे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 

उमेदवारांच्या प्रदीर्घ मुलाखती घेऊन प्रदेशाध्यक्षांना अहवाल पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष आणि निवडणूक समिती त्यावर अंतिम निर्णय घेईल, अशी माहिती जगताप यांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Congress candidate to decide today