खोपोलीत गुरुवारचा बाजार बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 मार्च 2020

रुवार बाजार म्हणजे गर्दीचे ठिकाण. यानिमित्ताने मुंबई, उल्हासनगर व अन्य ठिकाणांहून व्यापारी येऊन येथे दुकाने लावतात. कोरोनाची वाढलेली गडद छाया बघता खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनास गुरुवारचा बाजार बंद करण्याची मागणी केली होती.

खोपोलीः शहरातील गुरुवारच्या आठवडा बाजारावर कोरोनाचा परिणाम झाला असून, बाजारात होणारी गर्दी पाहता पालिका व पोलिसांनी एकत्रित निर्णय घेऊन गुरुवारचा बाजार अनिश्‍चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज बाजार भरला नसल्याने शुकशुकाट होता.

कोरोनाच्या धास्तीने सॅनिटायझरचा तुटवडा
 
गुरुवार बाजार म्हणजे गर्दीचे ठिकाण. यानिमित्ताने मुंबई, उल्हासनगर व अन्य ठिकाणांहून व्यापारी येऊन येथे दुकाने लावतात. कोरोनाची वाढलेली गडद छाया बघता खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनास गुरुवारचा बाजार बंद करण्याची मागणी केली होती. पालिका प्रशासनाकडूनही यासंदर्भात पोलिस, व्यापारी व बाजार संबंधित अन्य घटकांशी बाजार बंद ठेवण्याबाबत चर्चा सुरू होती. सर्व पार्श्‍वभूमीवर व कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पालिकेकडून आजपासून सूचना प्राप्त होईपर्यंत अनिश्‍चित काळासाठी बाजार बंद ठेवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याने दोन दिवस चर्चेदरम्यान काही व्यापाऱ्यांनी संपूर्ण गुरुवार बाजार बंद ठेवण्याबाबत नाराजी व्यक्त केली होती; मात्र कोरोनाची तीव्रता पाहता बाजार बंद ठेवण्याच्या निर्णयाला एकमुखी पाठिंबा व सहकार्य करण्याचा निर्णय घेतला गेला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad-corona viras-market effect

टॉपिकस