रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिले रात्रीच्या संचारबंदीचे संकेत; पोलिसांच्या अहवालानंतर घेतला जाणार निर्णय

रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिले रात्रीच्या संचारबंदीचे संकेत; पोलिसांच्या अहवालानंतर घेतला जाणार निर्णय

अलिबाग: रायगडमध्ये येणाऱ्या पर्यटकांना आवर घालणे कठीण जात असल्याने रात्रीची संचारबंदी लावण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगत संचारबंदीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. स्थानिक पातळीवरील परिस्थितीचा अहवाल पोलिस अधिक्षकांकडून आल्यानंतर त्याबद्दल निर्णय घेतला जाणार आहे.

मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत संचारबंदी गरजेची आहे का, याबद्दल विचारणा केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी याबद्दल अद्याप कोणताही अहवाल राज्यशासनाकडे पाठवलेला नाही. मुरुड, अलिबाग, श्रीवर्धन, माथेरान या नगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. नाताळच्या सुट्टीमुळे त्यांच्या संख्येत भर पडत आहे. महानगर पालिका क्षेत्रातील रात्रीच्या संचारबंदीमुळे थर्टीफस्टच्या सेलिब्रेशनसाठी पर्यटकांची संख्या वाढत जाणार आहे. याच दरम्यान कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याने रायगड जिल्ह्यात 2 जानेवारीपर्यंत निदान रात्रीची संचारबंदी जाईल, असे सुतोवाच दिले आहेत. पोलिस प्रशासनाला या संदर्भात आढावा घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींशी संवाद साधून संचारबंदीचे महत्व सांगण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. रात्रीची संचारबंदी लावण्यासाठी पोलिसांना जादा मनुष्यबळ, वाहनांची गरज भासणार आहे. त्याचीही चाचपणी केली जात, अशी माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयातून देण्यात आली. 

रायगड जिल्ह्यात सध्या मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. ब्रिटनमध्ये करोनाचा नविन विषाणू आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह सर्व महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते सकाळी 6 दरम्यान संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारपासून ही संचारबंदी लागू झाली आहे. त्यामुळे मोठ्या शहरातील नागरिक नाताळ आणि थर्टीफस्टच्या सेलिब्रेशनसाठी रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे धाव घेण्याची शक्यता आहे. यासाठी  आता रायगड जिल्ह्यातही रात्रीची संचारबंदी करण्याचे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद  
मुरुड जंजिरा किल्ल्याला भेट देण्यासाठी सध्या मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. यासंदर्भातील तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे येत होत्या. गर्दीचे नियोजन करणे कठीण जात असल्याने रविवार, 27 डिसेंबरपासून जंजिरा किल्ल्याचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद ठेवले जाणार आहेत.  

येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे. थर्टीफस्ट निमित्ताने रात्री उशिरापर्यंत पार्ट्या रंगु शकतात.  त्याच्या उत्साहावर पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईचा गालबोट लागू नये, यासाठी जास्त प्रयत्न केले जात आहेत. यासाठी निदान रात्रीच्या वेळेला संचारबंदी लागणे गरजेचे आहे. 
- निधी चौधरी
जिल्हाधिकारी- रायगड

Raigad District Collector signals night curfew The decision will be taken after the police report

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com