Raigad : वीजचोरांना कोट्यवधींचा दंड

नऊ महिन्यांत दोन कोटी ७९ लाखाची वसुली
Electricity Power theft case
Electricity Power theft case esakal

अलिबाग : महावितरण कंपनीने वीजचोरीविरोधात रायगड जिल्ह्यात धडक कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्याच्या बहुतांश भागाचा समावेश होणाऱ्या पेण परिमंडळात ६८६ प्रकरणांत दोन कोटी सहा लाख रुपयांची वीज चोरी पकडण्यात आली. तर बेकायदा वापर करणाऱ्यांकडून ७३ लाखाचा दंड वसूल करण्यात आला. गेल्‍या नऊ महिन्यात एकूण ९४७ जणांवर कारवाई करत २ कोटी ७९ लाखांची वसुली करण्यात आली.

वीजचोरीचे प्रकार तळा, म्हसळा या ग्रामीण तालुक्यांपेक्षा अलिबाग, पनवेल या शहरी भागाचा समावेश असलेल्या तालुक्यांमध्ये वाढत असल्याचे कारवाईतून आढळले आहे. महावितरणची थकबाकी वाढत असल्याने भांडूप परिमंडळाच्या सर्व विभागांमध्ये थकबाकी वसुलीसाठी मोहीम उघडण्यात आली. वीज जोडणी तपासणी, ०-३० रीडिंग नोंदवत असलेल्या मीटरची तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीमध्ये भांडूप परिमंडळात १ एप्रिल ते १५ जानेवारीपर्यंत विद्युत कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

पेण मंडळातील ६८६ प्रकरणांत दोन कोटी सहा लाखांची वीजचोरी पकडली आहे. याशिवाय बेकायदेशीर वापर करणाऱ्या २६१ जणांवर दंडात्मक कारवाई करत ७३.४८ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. मुख्य अभियंता भांडूप परिमंडळ सुनील काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पेण मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता इब्राहिम मुलानी यांनी रायगड जिल्ह्यात मोहीम राबवली आहे.

लाचखोर अभियंत्‍याला मुरूडमध्ये अटक

मुरूड (बातमीदार) : राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मुरूड उपविभागांतर्गत असणाऱ्या कोकबन येथे कार्यरत कनिष्ठ अभियंता ओम विश्वनाथ शिंदे (२९) यास अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १५ हजारांची लाच घेताना पकडले.

शिंदे यांनी तक्रारदाराच्या राहत्या घराचा विद्युत पुरवठा काही कारणास्तव खंडित केला होता. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी शिंदेने २० हजारांची लाच मागितली. अखेर १५ हजारांवर तडजोड करण्यात आली. तक्रारदाराकडून कोकबन येथील कार्यालयात लाच घेताना शिंदेला लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले.

वीजचोरी रोखणे हे महावितरणपुढे एक मोठे आव्हान आहे. वीज चोरांवर तीव्र कारवाई करण्यात येत असून ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिट वीजेचे पैसे प्रामाणिकपणे भरले पाहिजे. वीजचोरीसारख्या अनधिकृत वीजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांविरुद्धही कठोर कारवाई करण्यात येत असून अशा ग्राहकांना दंड व कठोर शिक्षा होऊ शकते.

- सुनील काकडे, मुख्य अभियंता, भांडूप परिमंडळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com