रायगड एक्‍स्प्रेस सुधीर तांडेल यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 मे 2020

रायगड एक्‍स्प्रेस अशी ख्याती असलेला उरण तालुक्‍यातील जसखार गावातील डावखुरा जलदगती गोलंदाज सुधीर तांडेल (40) यांचे आज रात्री नवी मुंबईतील खासगी रुग्णालयात निधन झाले. तो गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाने आजारी होता. तो गोलंदाजीला आल्यानंतर अनेक दिग्गज फलंदाजही त्याच्या समोर नांगी टाकत.

उरण: रायगड एक्‍स्प्रेस अशी ख्याती असलेला उरण तालुक्‍यातील जसखार गावातील डावखुरा जलदगती गोलंदाज सुधीर तांडेल (40) यांचे आज रात्री नवी मुंबईतील खासगी रुग्णालयात निधन झाले. तो गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाने आजारी होता. 

वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षांपासून सुधीरने टेनिस क्रिकेटच्या अनेक स्पर्धा गाजवण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. तो गोलंदाजीला आल्यानंतर अनेक दिग्गज फलंदाजही त्याच्या समोर नांगी टाकत. त्याने देशभरातील अनेक मैदाने गाजवली.

हे वाचा : कॉंग्रेसच्या साहसवादाला विरोध 

दुबईतील क्रिकेटमध्ये त्याने सरस कामगिरी करत जगभरातील टेनिस क्रिकेट शौकिनांची मने जिंकली होती. त्या देशात झालेल्या 2016 मधील स्पर्धेत त्याच्यावर बक्षिसांचा वर्षावर झाला होता. अनेक वेळा तो सामनावीर झाला होता. आक्रमक गोलंदाजीचा मारा करत असताना तो तितकाच संयमीही होता. त्यामुळे त्याचे प्रत्येक खेळाडूबरोबर मैत्रीचे संबंध होते. रायगड जिल्हा संघाकडून खेळत असला तरी त्याचे राज्यभर चाहते आहेत. 

हे वाचा : नोकरी मिळत नाही...पण घाबरू नका... 

दोन दिवसांपुर्वी त्याच्यावरील वैद्यकिय मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते. त्यावेळी त्याच्यावर मदतीचा अक्षरक्ष पाउस पडला. तर अनेकांनी मदत करण्याचे जाहीर केले होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Express Sudhir Tandel passes away