श्रीवर्धन पावसामुळे संपर्कहीन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

पावसाने अक्षरशः रौद्र रूप धारण केले होते. गेली कित्येक वर्षे एवढा पाऊस पडला नव्हता, असे नागरिकांतून सांगितले जाते. एक तर पावसामुळे लोक वैतागलेले आहेतच; पण वीज नसल्याने आणखी त्यामध्ये गैरसोईची भर पडली आहे. सतत विजेचा खेळखंडोबा चालू असून, व्यवसायावरही परिणाम होत आहे. मोबाईल नेटवर्क गायब झाले असून, बोर्लीपंचतन, श्रीवर्धन, म्हसळा तालुक्‍यात नेटवर्क नसल्याने संपर्क होत नाही.

मुंबई ः रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्‍यात गेले पाच-सहा दिवस पावसाने धुमाकूळ घातल्याने जनजीवन विस्कळित तर झालेच आहे; पण वीज नसल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यावर पाणी रस्त्यावरून जात होत. त्यामुळे पाण्याचा निचरा होईपर्यंत काही काळ रस्त्यावरच वाहने उभी होती.

पावसाने अक्षरशः रौद्र रूप धारण केले होते. गेली कित्येक वर्षे एवढा पाऊस पडला नव्हता, असे नागरिकांतून सांगितले जाते. एक तर पावसामुळे लोक वैतागलेले आहेतच; पण वीज नसल्याने आणखी त्यामध्ये गैरसोईची भर पडली आहे. सतत विजेचा खेळखंडोबा चालू असून, व्यवसायावरही परिणाम होत आहे. मोबाईल नेटवर्क गायब झाले असून, बोर्लीपंचतन, श्रीवर्धन, म्हसळा तालुक्‍यात नेटवर्क नसल्याने संपर्क होत नाही.

एखादा व्यक्ती आजारी असेल तर त्याला इतरत्र हलवायचा असेल तर अत्यावश्‍यक सेवाच गायब झाल्याने लोक संपर्कच करू शकत नाही, अशी अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे. याचे मोबाईल कंपन्यांना काहीच सोयरसुतक नाही किंवा माहिती लोकांना पुरवत नाही म्हणून लोकांमध्ये संताप आहे. जनजीवन पूर्वपदावर येत आहे त्याप्रमाणे मोबाईल कंपन्यांनी आपला नेटवर्क पूर्ववत करावा व लोकांना होणारा त्रास व गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue