नागावमधील ग्रामस्थ आक्रमक

विद्युतवाहिन्या बदलण्याबाबत वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यकारी अभियंता माणिकलाल तपासे यांना निवेदन देताना नागाव येथील ग्रामस्थ.
विद्युतवाहिन्या बदलण्याबाबत वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यकारी अभियंता माणिकलाल तपासे यांना निवेदन देताना नागाव येथील ग्रामस्थ.

चोंढी : अलिबाग तालुक्‍यात नागाव ग्रामपंचायत हद्दीतील जीर्ण झालेल्या वीजवाहिन्या बदलण्याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही आजही परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे नागावमधील संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गुरुवारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यकारी अभियंता माणिकलाल तपासे यांना घेराव घातला. पुढील पंधरा दिवसांत कारवाई न झाल्यास उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला. 

नागावमधील वीजवाहिन्या सुमारे ६० ते ६५ वर्षे जुन्या आहेत. गेल्या आठ दिवसांमध्ये नागाव विभागात मुख्य वाहिनीच्या विजेच्या तारा विविध ठिकाणी तुटून पडल्या होत्या. त्यामुळे येथे जीवितहानी होण्याची दाट शक्‍यता होती. त्यामुळे येथील ग्रामस्थांसह नागाव ग्रामपंचायतीतर्फे वीज वितरण विभागाला वारंवार लेखी व तोंडी सूचना देऊनही आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. 

येत्या १५ दिवसांत जुनी असलेली सर्व यंत्रणा बदलून नवीन विजेच्या वाहिन्या जोडण्यात याव्यात, असे लेखी निवेदन देण्यात आले. तसे न झाल्यास महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा ग्रामस्थांतर्फे देण्यात आला. त्‍या वेळी प्रशासनाच्‍या चालढकल कारभाराविरोधात ग्रामस्‍थांनी संताप व्‍यक्‍त केला. 

यावेळी नागावचे सरपंच निखिल मयेकर, माजी सरपंच नंदकुमार मयेकर, उपसरपंच राकेश म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य सुरेंद्र नागलेकर, हर्षदा मयेकर, माजी सदस्य राजेंद्र मयेकर यांच्यासमवेत मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. 

वीजवाहिन्या बदलण्याबाबत वरिष्ठांबरोबर पत्रव्यवहार सुरू केला आहे. सध्या असलेल्या कंत्राटदाराला मुदतवाढ देऊन काम पूर्ण करण्यास सांगितले आहे. कंत्राटदार काम करताना दिरंगाई करत असल्यामुळे काम पूर्ण होण्यास वेळ लागत आहे. यासाठी वाढीव दिवसांचा दंड कंत्राटदाराकडून वसुली करण्यात येणार आहे. ऑक्‍टोबरपर्यंत काम पूर्ण होईल.
- माणिकलाल तपासे, कार्यकारी अभियंता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com