कर्जतमध्‍ये चार ग्रामपंचायतींमध्‍ये चुरस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

नेरळ : कर्जत तालुक्‍यातील उमरोली, वाकस, जामरुंग आणि रजपे या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका शनिवारी (ता. ३१) होत आहेत. वाकस ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली असून, अन्य तीन ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंचपदासाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत.

कर्जत तालुक्‍यातील या पाच ग्रामपंचायतींची मुदत १३ डिसेंबरला संपणार असल्याने ३१ ऑगस्टला निवडणुका होत आहेत. वाकस ग्रामपंचायतीमधील नऊ सदस्यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली असून, उर्वरित दोन जागांसाठी चार उमेदवारांत लढत होईल. तेथे सुदर्शना संजय तांबोळी या थेट सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आल्या आहेत. 

जामरुंग या नव्या ग्रामपंचायतीमध्ये दोन सदस्य बिनविरोध निवडून आले असून, उर्वरित सात जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत. जामरुंग येथे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या थेट सरपंचपदासाठी जयवंत एकनाथ पिंपरकर आणि दत्तात्रय भाऊ पिंपरकर यांच्यात लढत होईल. रजपे या नव्या ग्रामपंचायतीमधील सात जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत. 

मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असलेल्या थेट सरपंचपदासाठी माजी सरपंच दीपाली प्रमोद पिंगळे यांची लढत रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य रेश्‍मा सोपान भालीवडे यांच्याशी होत आहे. या सर्व ग्रामपंचायतींसाठी ३१ ऑगस्टला मतदान होणार असून, ३ सप्टेंबरला मतमोजणी होईल. ऐन गणेशोत्सवात मतमोजणी होणार असल्याने पोलिस दल सतर्क झाले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue