पेणमधील रिंगरोड मार्गी लागणार

संग्रहित
संग्रहित

पेण : मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून (एमएमआरडीए) पेण शहरातील रिंग रोडसाठी सुमारे ५३ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यामुळे पेणच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होईल, असा विश्‍वास पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 

काही वर्षांपासून पेण शहराचा विस्तार वेगाने होत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना चांगल्या सोईसुविधा देण्यासाठी पालिका सातत्याने प्रयत्न करीत आहे. माजी मंत्री रवीशेठ पाटील यांच्या प्रयत्नांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.  त्यानुसार मोतीराम तलाव ते कॅनालपर्यंत १८ मीटर रुंदीचा रस्ता तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजपत्रकीय रक्कम चार कोटी ९८ लाख रुपये, कॅनाल ते बोरगावकडे जाणारा रस्ता या भागातील १८ मीटर रस्ता रुंदीकरण, बोरगाव रस्ता ते हिमा स्पन पाईप कंपनी मार्गाच्या रुंदीकणाची कामे करण्यात येणार आहे.

यापूर्वी आगरी समाज चिंचपाडा पामबीच रस्त्यासाठी तीन कोटींचा निधी दिला आहे. नाट्यगृहासाठी वाढीव तीन कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यानी मंजूर केला असल्याने ते कामदेखील लवकरच पूर्ण करण्यात येईल, असेही प्रीतम पाटील यांनी सांगितले.  

ग्रामीण भागासाठी लाखोंचा निधी
पेण तालुक्‍यातील ग्रामीण भागातील कोप्रोली गावातील अंतर्गत रस्ते यासाठी २५ लाख रुपये, तरणखोप गावातील अंतर्गत रस्ते व गटारे यासाठी ३५ लाख, हमरापूर गावातील अंतर्गत रस्ते यासाठी ५० लाख, दादर गावातील अंतर्गत गटारे यासाठी १० लाख, जोहे गावातील अंतर्गत रस्त्यांसाठी ५० लाख, सोनखार गावातील अंतर्गत रस्त्यांसाठी १० लाख आणि रावे गावातील रस्त्यांसाठी ५० लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com