सुधागडमध्ये महिलेचा मृतदेह 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

शशिकला यांचा मृतदेह घपकी गावातील विठ्ठल मंदिराच्या बाजूने कवेळे धरणातून वाहणाऱ्या ओहोळात सापडला. याबाबत सचिन मारुती पवार यांनी फिर्याद दिली.

पाली ः सुधागड तालुक्‍यातील कवेळे धरणातून वाहणाऱ्या ओहोळात मंगळवारी (ता. 10) एका महिलेचा मृतदेह सापडला. शशिकला मारुती पवार (वय 65) असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे.

शशिकला मारुती पवार (रा. वाफेघर, ता. सुधागड) या बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या नातेवाइकांनी पाली पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार सभोवतालच्या परिसरात शोध घेतला असता मंगळवारी (ता. 10) सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास शशिकला यांचा मृतदेह घपकी गावातील विठ्ठल मंदिराच्या बाजूने कवेळे धरणातून वाहणाऱ्या ओहोळात सापडला. याबाबत सचिन मारुती पवार यांनी फिर्याद दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार प्रशांत भोईर करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue