रोह्यात जमीन घोटाळा भोवला

संग्रहित
संग्रहित

रोहा  : दिव येथील जमीन घोटाळाप्रकरणी काही दिवसांपूर्वी नायब तहसीलदार सिराज तुळवे यांचे निलंबन झाल्यानंतर आता मंडळ अधिकारी परशुराम लहाने यांनाही निलंबित करण्यात आले आहे.  या प्रकरणाशी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांसहित दलाल व इतर सर्वांचीच उच्चस्तरीय चौकशी करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सर्वहारा संघटनेच्या अध्यक्षा उल्का महाजन यांनी केली आहे. 

रोहा तालुक्‍यातील दिव येथील सरकारी खाजण जमीन घोटाळाप्रकरणी मंडळ अधिकारी परशुराम लहाने यांना निलंबित करण्यात आले आहे. नायब तहसीलदार सिराज तुळवे यांच्यानंतर ही दुसरी कारवाई आहे. ६ सप्टेंबरच्या जिल्हाधिकारी रायगड यांच्या पत्रांन्वये ही कारवाई केल्याची माहिती तहसीलदार कविता जाधव यांनी दिली. 

चणेरा दिव गावच्या हद्दीतील गट क्रमांक १३३ सातबाऱ्यावरील ३४२ एकर सरकारी खाजण जमीन घोटाळ्याचे हे प्रकरण आहे. यात महसूल विभागाचे अधिकारी, दलाल व इतर गुंतवणूकदार यांनी संगनमताने सरकारी पडीक जमीन आधी खोती म्हणून नोंद केली, त्यानंतर कुळांच्या नावे केली. त्यानंतर पुन्हा कुळांकडून कुलमुखत्यार करून जमीन गुंतवणूकदारांच्या नावे केल्याची घटना घडली होती. स्थानिकांनी आवाज उठवल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. सर्वहारा संघटना या प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी मागणी करीत आहे.

जिल्हाधिकारी यांच्या पत्रांन्वये मंडळ अधिकारी परशुराम लहाने यांचे निलंबन करण्यात आले आहे. 
- कविता जाधव, तहसीलदार, रोहा तालुका 


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com