पेणमध्ये निर्माल्यापासून खतनिर्मिती 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

पेण, ता. 15 (वार्ताहर) : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पेण तालुक्‍यातील गणेश विसर्जन ठिकाणी 27 टन निर्माल्य गोळा करण्यात आले. या निर्माल्यापासून खतनिर्मिती केली जाणार आहे. 

पेण, ता. 15 (वार्ताहर) : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पेण तालुक्‍यातील गणेश विसर्जन ठिकाणी 27 टन निर्माल्य गोळा करण्यात आले. या निर्माल्यापासून खतनिर्मिती केली जाणार आहे. 

रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण व संवर्धन, स्वछता अभियान, प्रौढ साक्षरता वर्ग, विहीर पुनर्भरण असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. मागील वर्षापासून गणेश विसर्जनावेळी मूर्तीबरोबरच नदीत निर्माल्यदेखील विसर्जित करण्यात येत असल्यामुळे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. या जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी विसर्जनावेळी निर्माल्य गोळा करून त्यापासून खतनिर्मिती करण्यात येत आहे. 

या उपक्रमांतर्गत या वर्षीदेखील पेण तालुक्‍यातील पेण, वाशी नाका, वाशी, रावे, वरवणे, वरसई, सापोली, धावते, आंबिवली, जिते, हनुमान पाडा, दादर, शिर्की, वडखळ, भाल या सोळा बैठकांतील 1341 श्री सदस्यांनी दीड दिवसाच्या गणेश विसर्जनावेळी 2623, पाच दिवसांच्या विसर्जनावेळी 5183, गौरी विसर्जना दिवशी 911 व अनंत चतुर्दशीदिवशी 1098 असे एकूण 8 हजार 904 गणेशमूर्तींचे निर्माल्य गोळा केले असून पेण नगरपालिकेच्या आंबेगाव येथील घनकचरा प्रकल्प येथे नेऊन त्याच्यावर खतनिर्मितीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue