पोलिसांचा गणरायाला निरोप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

अलिबाग : संगीताचा ताल आणि गाण्यांच्या सुरावर नाचत रायगड पोलिसांनी धुमधडाक्‍यात गणरायाची विसर्जन मिरवणूक काढली. पोलिस मुख्यालयासह, जिल्ह्यातील २९ ठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. विसर्जन मिरवणुकीत पावसाने काही वेळ विश्रांती घेतल्याने पोलिसांनी जड अंत:करणाने गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. 

नागरिकांना सण निर्विघ्न साजरे करता यावेत, यासाठी पोलिस नेहमी दक्ष राहून काम करीत असतात. निवडणूक, सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमांबरोबरच वेगवेगळ्या मिरवणुकांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अधिकाऱ्यांपासून शिपायांपर्यंत सर्वच पोलिस आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असतात. त्यामुळे पोलिसांना वेगवेगळे सण त्यांच्या कुटुंबीयांसोबत साजरे करता येत नाही. रायगड पोलिस दलाच्या २८ पोलिस ठाणे व पोलिस मुख्यालय अशा एकूण २९ ठिकाणी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.

दहाव्या दिवशी सार्वजनिक गणपतींचे विसर्जन असल्याने पोलिसांना त्या दिवशी गणरायाला निरोप देता आला नाही. एक दिवस उशिरा म्हणजे शुक्रवारी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. पोलिस मुख्यालयातील गणेशमूर्तीची मिरवणूक सकाळी काढण्यात आली. सर्व पोलिस ठाण्यातील गणपती मिरवणुकीला सायंकाळी पाचनंतर सुरुवात झाली. अलिबाग पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचारी डोक्‍यावर फेटा, टीशर्ट घालून एका वेगळ्या रुबाबात दिसत होते. मराठी गाण्यांसह हिंदी गाण्यांच्या ठेक्‍यावर पोलिसही नाचत होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue