रायगडात भगवा फडकणारच

विजय संकल्प मेळाव्यात मार्गदर्शन करताना युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्‍यासमवेत जिल्‍हाप्रमुख महेंद्र दळवी, नरेश गावंड.
विजय संकल्प मेळाव्यात मार्गदर्शन करताना युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्‍यासमवेत जिल्‍हाप्रमुख महेंद्र दळवी, नरेश गावंड.

पेण : रायगडात विरोधकांची अभद्र आघाडी झाली असली, तरीही शिवरायांच्या रायगडात विजयाचा भगवा फडकणारच, असा विश्वास युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पेण येथील जनआशीर्वाद यात्रेवेळी सोमवारी व्यक्त केला. तसेच रायगडात लवकरच विजयी मेळावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

पेणमध्ये आगरी समाज सभागृहात विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी, रायगड जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन, उप-जिल्हाप्रमुख नरेश गावंड, सल्लागार बबन पाटील, तालुकाप्रमुख अविनाश म्हात्रे, संदीप तटकरे, सिद्धेश कदम, श्रीकांत शिंदे, कामगारनेते सचिन अहिर, शहरप्रमुख एस. एम. म्हात्रे, दीपश्री पोटफोडे, शैलेश पाटील, रशाद मुजावर, अच्युत पाटील, चेतन मोकल, प्रसाद देशमुख, नरेश सोनवणे, आशीष वर्तक, तुकाराम म्हात्रे यांच्यासह युवासेना महिला आघाडी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या वेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, जनआशीर्वाद यात्रा तरुणांच्या मनातील नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी काढण्यात आली आहे. जनतेने आमच्यावर दाखविलेल्या विश्वासाचे आभार मानण्यासाठी, नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी ही आशीर्वाद यात्रा नव्हे; तर तीर्थयात्रा काढण्यात आली आहे. जनता हीच खरी देव असल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले. शिवसेना निवडणुकीपुरती जनतेच्या संपर्कात नसते; तर ८० टक्के समाजकारणातून सातत्याने संपर्कात असते. शिवसेना प्रश्न सोडविताना जात, धर्म, पक्ष यांचा विचार करत नाही; तसेच आम्ही दिलेले वचन पूर्ण करतोच, असे त्‍यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com