नागोठण्‍यात नवरात्रोत्सवाची लगबग सुरू

श्री जोगेश्‍वरी माता
श्री जोगेश्‍वरी माता

नागोठणे : नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्‍वरी माता व भैरवनाथ महाराज यांच्या नवरात्रोत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या नवरात्रोत्सवानिमित्त मुंबई येथील ह.भ.प. राजेंद्र मांडेवाल महाराज यांच्या कीर्तनाची पर्वणी ग्रामस्थांना नऊ दिवस मिळणार आहे. 

नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्‍वरी मातेच्या नवरात्रोत्सवाच्या आयोजनासंदर्भातील बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला श्री जोगेश्‍वरी माता विश्‍वस्त समितीचे सचिव भाई टके, जयराम पवार, विलास चौलकर, काका माने, श्री जोगेश्‍वरी माता उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब टके, सचिव अनिल नागोठणेकर, नामदेव चितळकर, खजिनदार अनंता मोरवणकर, सुनील लाड, विजय नागोठणेकर, दीपक वाडेकर, राजा गुरव, किरण लाड, पांडुरंग कोळी, जगदीश चौलकर, दिनेश घाग, विनोद अंबाडे, संजय राजिवले, बाळा पाटील, रवींद्र वाजे, संतोष नागोठणेकर, राजेंद्र गायकर आदींसह ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते. 

सभेच्या सुरुवातीलाच नागोठणे शहर विभागातील मृत व्यक्ती तसेच महापुरात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी मागील सभेचे इतिवृत्त व जमा खर्च वाचून मंजूर करण्यात आला. मंदिरासमोरील प्रांगणात नवरात्रोत्सवात नऊ दिवस सायंकाळच्या रास गरबासह इतर मनोरंजनात्मक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. याशिवाय मंदिरातील काही भागात होणारी गळती थांबविण्यासाठी पावसाळ्यानंतर उपाययोजना करण्याचे या वेळी ठरविण्यात आले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com