अलिबागमध्ये कुस्तीचा थरार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

अलिबाग : अलिबाग तालुक्‍यातील वाडगाव येथील हनुमान तालीम संघ व ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आवास येथील कालभैरव तालीम संघ विजयी ठरला आहे. विजेत्या संघाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

अलिबाग : अलिबाग तालुक्‍यातील वाडगाव येथील हनुमान तालीम संघ व ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आवास येथील कालभैरव तालीम संघ विजयी ठरला आहे. विजेत्या संघाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

कुस्ती स्पर्धेचा उद्‌घाटन सोहळा माजी उपसरपंच काशिनाथ भगत यांच्या हस्ते झाला. या वेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष नथुराम म्हात्रे, मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकूर, उपसरपंच प्रसाद पाटील, माजी उपसरपंच नरेश थळे, शंकर पाटील, मिलिंद भगत, सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. 

ही स्पर्धा अलिबाग तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष जयेंद्र भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्पर्धेचे सूत्रसंचालन व समालोचन नरेश कडू, सुनील थळे व प्रवीण भगत यांनी केले. स्पर्धेमध्ये अजित माळी पुरस्कृत द्वितीय क्रमांकाची कुस्ती सतीश जाधव (मुंबई) विरुध्द फैजन चौधरी (पुणे) अशी रंगली; तर निवास भगत पुरस्कृत तृतीय क्रमांकाची कुस्ती पप्पू काळे (पुणे) विरुद्ध मल्लु यादव (मुंबई) यांच्यामध्ये झाली.

या स्पर्धेत अंतिम आव्हानाची कुस्ती नाथा चौगुले (गंगावेस तालीम कोल्हापूर) विरुद्ध अनिल बाम्हणे (गोकुळ वस्ताद तालीम, पुणे) यांच्यात झाली. नाथा चौगुले यांच्या खांद्याला दुखापत झाल्याने पंचांनी अनिल बाम्हणेला विजयी घोषित केले. स्पर्धेमध्ये अंतिम आव्हानांची कुस्तीचे 28 हजार रुपयांचे पारितोषिक अनिल बाम्हणे यांना मिळाले. 

या स्पर्धेत सांघिक विजेतेपद काल भैरव तालीम संघ आवासला मिळाले. आवास येथील कालभैरव तालीम संघाला प्रथम क्रमांक, आंदोशी येथील शिवाजी व्यायामशाळा संघाला द्वितीय क्रमांक व मांडवा येथील टाकादेवी स्पोर्टस क्‍लबला तृतीय क्रमांक मिळाला. या वेळी तालुका कुस्तीगीर संघाचे पंच प्रमोद भगत, वैभव मुकादम, नरेश भोपी, रवींद्र घासे, संदीप मोरे, वासुदेव पाटील, सुधाकर पाटील, प्रकाश भगत, जितेंद्र गावंड, यतिराज पाटील यांचे सहकार्य लाभले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue