कर्जत उपजिल्हा रुग्णालयात बाल उपचार केंद्र 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

तीव्र कुपोषित श्रेणीत दहा मुले पहिल्या टप्प्यात या बाल उपचार केंद्रात दाखल करून या मुलांना आरोग्य व पोषण सेवा मोफत दिली जाणार आहे. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा बालरोगतज्ज्ञ डॉ. बनसोडे यांच्यामार्फत मुलांवर उपचार केले जाणार आहेत.

कर्जत ः उपजिल्हा रुग्णालयात जिल्हा विकास योजनेमधून तालुक्‍यासाठी बालविकास केंद्र चालविण्यासाठी दोन लाख रुपयांच्या निधीची तरतूद करून बाल उपचार केंद्र सुरू केले असून, याचे उद्‌घाटन आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते करण्यात केले.

तीव्र कुपोषित श्रेणीत दहा मुले पहिल्या टप्प्यात या बाल उपचार केंद्रात दाखल करून या मुलांना आरोग्य व पोषण सेवा मोफत दिली जाणार आहे. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा बालरोगतज्ज्ञ डॉ. बनसोडे यांच्यामार्फत मुलांवर उपचार केले जाणार आहेत. उपजिल्हा रुग्णालयात सुरू होणाऱ्या बाल उपचार केंद्रात दाखल केलेल्या मुलांसह त्याच्यासोबत येणाऱ्या एका पालकास मोफत भोजन व इतर सुविधा दिल्या जाणार आहेत.

21 दिवस सीटीसीमध्ये उपचार घेण्यात येणाऱ्या पालकांना प्रतिदिन 100 रुपये याप्रमाणे बुडित मजुरी देण्यात येणार आहे. पालकांनी मुलांसोबत येताना स्वतःचे बॅंक खाते क्रमांक व आधार कार्डसोबत आणावे, अशा सूचना डॉ. मनोज बनसोडे यांनी दिल्या.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue