अलिबाग पोलिस ठाण्यावर वडाचे झाड कोसळले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

अलिबाग : अलिबाग पोलिस ठाण्याच्या आवारातील जुने वडाचे झाड अचानक शनिवारी कोसळले. हे झाड पोलिस ठाण्यावर पडल्याने पोलिस ठाण्याची वित्तहानी झाली. त्यात विद्युततारही कोसळली. मात्र सुदैवाने जीवितहानी टळली.

अलिबाग : अलिबाग पोलिस ठाण्याच्या आवारातील जुने वडाचे झाड अचानक शनिवारी कोसळले. हे झाड पोलिस ठाण्यावर पडल्याने पोलिस ठाण्याची वित्तहानी झाली. त्यात विद्युततारही कोसळली. मात्र सुदैवाने जीवितहानी टळली.

अलिबाग पोलिस ठाणे नेहमीप्रमाणे गजबजलेले होते. त्यात पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची ठाण्यामध्ये सभा सुरू होती. अनेक वर्षांपासून आवारात असलेले वडाचे झाड अचानक कोसळले. आवाज झाल्याने पोलिस ठाण्यात असलेल्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. झाड पोलिस ठाण्यावर पडले. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु वित्तहानी प्रचंड झाली. त्यात विद्युततारही तुटून पडल्याने या मार्गावरून जाण्यास बंदी घालण्यात आली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue