भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे अखेर सुरू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

खोपोली : मुसळधार पावसामुळे तालुक्‍यातील भातशेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या भातशेतीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, यासाठी खालापूर तहसीलदार इरेश चप्पलवार यांना खालापूर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले होते. तहसीलदार यांनी या निवेदनाची दखल घेवून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले. 

तालुक्‍यातील लागवडीखाली असणाऱ्या भातशेतीचे नुकसानीबाबतचे रितसर पंचनामे करण्याची मोहीम सुरू झाली आहे. खालापूर तालुक्‍यात ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये मुसळधार पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागातील माती शेतामध्ये आल्यामुळे भातशेती या मातीखाली गाडली गेली. त्याचबरोबर पावसाच्या पाण्याचा प्रवाह खूप तीव्रतेने असल्यामुळे शेतात केलेली लागवड पूर्णपणे पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्यामुळे शेतकरी पूर्ण हतबल झाले आहेत. भात पेरणीपासून ते लागवडीपर्यंत घेतलेल्या मेहनतीवर पाणी फिरल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. 

 तालुक्‍यातील शेतकऱ्यांवर अन्याय होवू नये यासाठी स्थानिक शेतकरी संघटनांनी खालापूरचे तहसीलदार यांना या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी निवेदन दिले होते. खालापूर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तहसीलदार इरेश चप्पलवार यांना झालेल्या भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निवेदन देण्यात आले आहे. तहसीलदारांनी याची दखल घेऊन, संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याचे शेतकरी देविदास मालकर यांनी सांगितले

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue