रस्‍त्‍यांनी घेतला मोकळा श्‍‍वास

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

अलिबाग : केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभेच्या २८८ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम शनिवारी जाहीर केला असून यामध्ये रायगड जिल्ह्यातील ७ जागांसाठीही निवडणुका होत आहेत. आचारसंहिता लागू होताच जिल्हा प्रशासनाने नाक्‍या-नाक्‍यावर लावलेले जाहिरातीचे फलक काढण्यास सुरुवात केली आहे. एका दिवसातच २ हजार ४२७ फलक, होल्डिंग्ज काढण्यात आले आहे. दोन ते तीन दिवसांत राजकीय नेत्यांच्या जाहिरातींचे फलक काढण्यात येतील, असे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. त्यामुळे अलिबागमधील रस्त्यांनी आता मोकळा श्वास घेतला आहे.  

विधानसभा निवडणुका कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडाव्यात यासाठी जिल्हा प्रशासनाने आतापासूनच खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान राजकीय हिताची कामे करता येणार नाहीत.या निवडणुकीसाठी जिल्हातील २ हजार ६९३ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यासाठी पूर्वतयारी झालेली आहे. राजकीय उमेदवारांच्या प्रतिनिधींना या संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी सकाळी बैठक बोलावून जिल्हाधिकाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेची रूपरेषा समजावून दिली.

या निवडणुकीसाठी ३१ ऑगस्टच्या यादीनुसार २२ लाख ६६ हजार मतदारांना मतदानाचा हक्क मिळणार आहे. मतदानाचा आकडा जास्तीत जास्त वाढावा, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रविवारी दिली. या वेळी निवडणूक अधिकारी तथा उप-जिल्हाधिकारी वैशाली माने, पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर उपस्थित होते. 

पोलिस यंत्रणा सज्ज
आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज असणार असल्याची माहिती या वेळी पोलिस अधीक्षकांनी दिली. कायदा सुव्यवस्था बिघडण्यास कारणीभूत ठरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या समित्या नेमण्यात आल्या असून त्यांच्यातील समन्वय उप-विभागीय अधिकारी यांच्यामार्फत साधला जाणार आहे. नवमतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue