पाताळगंगा येथे पदपथ धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

रसायनी : पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राला जोडणाऱ्या एमआयडीसीच्या मुख्य रस्त्याच्या कडेच्या गटारावरील काही ठिकाणी झाकणे गायब झाली आहेत. त्यामुळे पदपथ धोकादायक झाले असून रस्त्यावरून जाताना पादचारी गटारात पडण्याची भीती आहे.

रसायनी : पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राला जोडणाऱ्या एमआयडीसीच्या मुख्य रस्त्याच्या कडेच्या गटारावरील काही ठिकाणी झाकणे गायब झाली आहेत. त्यामुळे पदपथ धोकादायक झाले असून रस्त्यावरून जाताना पादचारी गटारात पडण्याची भीती आहे.

एमआयडीसीने पराडे ते श्री सिद्धेश्वरी या औद्योगिक क्षेत्राला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचे चौपदरीकरण केले. रस्त्यावरील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी कडेला गटार बांधले आहे. त्याच गटारावरूनच औद्योगिक क्षेत्राकडे आणि इतर ठिकाणी जाणाऱ्या पादचाऱ्यांसाठी पदपथ बांधण्यात आला आहे. पराडे कॉर्नर ते पाताळगंगा नदीवरील पुलापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या पदपथावरून पादचारी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राकडे त्याचबरोबर पराडे आदिवासी वाडीतील महिला नदीवर धुणे-भांडी घेऊन जातात.

पाताळगंगा नदीच्या तीरावरील रसेश्वर मंदिरात भाविक पराडे कॉर्नर येथे उतरून जात असतात. या पदपथावरील काही ठिकाणी चेंबरची झाकणे गायब झाली असल्याने येथील पदपथ धोकादायक झाले आहेत. सुमारे पाच फूट खोल असलेल्या चेंबरमध्ये पादचारी पडण्याची भीती आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून झाकणे नसलेल्या ठिकाणी ती बसविण्यात यावीत, अशी मागणी राष्ट्रवादीचे रवीन्द्र पाटील यांच्यासहित नागरिकांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue

टॅग्स