आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा!

विकासकामांचे फलक झाकून ठेवताना कर्मचारी.
विकासकामांचे फलक झाकून ठेवताना कर्मचारी.

अलिबाग : विधानसभा निवडणुकीत सर्व समन्वय अधिकारी यांनी समन्वयाने काम करा. काम करताना आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होईल याची काळजी घ्यावी, अशा सूचना  जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीबाबत सर्व विभाग प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी बोलत होते. या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव व जिल्ह्यातील विविध विभागांचे कार्यालयप्रमुख उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी डॉ. विजय  सूर्यवंशी म्हणाले, निवडणूक कालावधीत सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवा निवडणूक आयोगाकडे वर्ग झाल्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या सूचनांचे व आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी राजकीय पक्षाच्या उमेदवारांना केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com