रसायनीत पॉली प्रॉपिलियन प्रकल्पाबाबत संभ्रम

जनसुनावणी
जनसुनावणी

रसायनी ः पॉली प्रॉपिलियन युनिट प्रकल्पाबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रम असून, याला काही ग्रामस्थांनी विरोध केला. प्रकल्पाविषयीची जनसुनावणी आज येथे झाली. या वेळी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना विविध प्रश्‍न विचारून भंडावून सोडले.
 
भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड, भारत सरकारचा उपक्रम यांच्या रसायनी येथील प्रस्तावित पॉली प्रॉपिलियन युनिट उभारण्याच्या तसेच भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड मुंबई यांच्या रिफायनरी ते रसायनी पाईपलाईन टाकण्याच्या प्रस्तावित प्रकल्पाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आज एचओसीएल कॉलनीत रसरंग हॉलमध्ये पर्यावरणविषयक जनसुनावणी घेतली.
 
जनसुनावणीला अध्यक्ष म्हणून पनवेल उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले, प्रदूषण नियंत्रक मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंखे, खालापूरचे नायब तहसीलदार आदी उपस्थित होते. प्रारंभी बीपीसीएल कंपनीचे वरिष्ठ अधिकारी नरेंद्र पाटील यांनी प्रास्ताविकात प्रकल्पाबाबतची सर्व प्रकारची माहिती दिली. त्यानंतर आचारसंहिता असताना जनसुनावणी घेतली जात आहे. जिल्हाधिकारी उपस्थित नसल्याने स्थानिकांनी मत मांडताना नाराजी व्यक्त केली आहे. प्रकल्पाला विरोध केला आहे.
 
रसायनी प्रकल्पग्रस्त विकास सामाजिक संस्थेचे सचिव काशीनाथ कांबळे आठ गावांची जनसुनावणी असताना परिसरातील ग्रामपंचायतींना कळविले नाही. मग हरकत कशी घेणार? दिलेल्या पत्रात प्रदूषण नियंत्रण मंडळाने विषय वेगळा आणि मजकूर वेगळा असल्याची माहिती दिली असल्याचा आरोप काशीनाथ कांबळे यांनी केला. ही फसवणूक असल्याची तक्रारही केली. पाईपलाईन जनसुनावणी स्वतंत्र घ्यायला पाहिजे होती. या प्रकल्पाला विरोध असल्याचे सांगितले. 

अध्यक्ष तात्यासाहेब म्हसकर, सहसचिव समीर खाने, उपाध्यक्ष रमेश पाटील, डॉ. पद्मनाथ पळणीटकर, सुरेश रानाडे, यादव दिघे, रामभाऊ पाटील, दत्ताराम दळवी, पांडुरंग माळी, विजय खारकर, उदय शिंदे, दत्तात्रेय जांभळे, गजानन माळी, आनंता दळवी आदींनी मत मांडले. तसेच या जनसुनावणी कार्यक्रमाला जिल्हा परिषद महिला आणि बालकल्या सभापती ऊमा मुंढे, जिल्हा परिषद सदस्य राजू पाटील, खालापूर तालुका पंचायत समिती सभापती कांचन पारंगे, सदस्य वृषाली पाटील, पनवेल तालुका पंचायत समिती जगदीश पवार आदी मान्यवर तसेच परिसरातील गावांमधील एचओसी प्रकल्पग्रस्त नागरिक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com