जिल्हा परिषदेचे कर्मचारी धास्तावले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या चौथ्या मजल्यावर जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील स्लॅब कोसळला. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, अजूनपर्यंत त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे या विभागातील कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला असून त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. 

जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष या विभागात अधिकाऱ्यांसह सात कर्मचारी काम करीत आहेत. या विभागातील पीओपी स्लॅबचा काही भाग अचानक कोसळला. सुदैवाने त्या वेळी कोणीही कर्मचारी नसल्याने जीवितहानी टळली. स्लॅब कोसळून अनेक दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अजूनपर्यंत त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. या ठिकाणी काम करणारे कर्मचारी जीव मुठीत घेऊन काम करत आहेत. प्रशासनाच्‍या दुर्लक्षामुळे येथे कर्मचारी धास्‍तावले आहेत. 

जिल्हा पाणी, स्वच्छता मिशन कक्षातील पडलेल्या स्लॅबच्या दुरुस्तीचे काम प्रस्तावित आहे. पावसाळा संपल्यावर काम सुरू करण्यात येणार असल्याचे रायगड जिल्हा परिषदेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. वाय. बारदेस्कर यांनी यावेळी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue