नेरळमध्ये कार जाळल्याने खळबळ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

गाडी इमारतीच्या खाली रात्री लावली होती. गाडीला पहाटेच्या सुमारास आग लागल्याचे आजूबाजूच्या रहिवाशांना दिसल्याने आरडाओरड झाला. घरातून खाली येईपर्यंत गाडी जळून खाक झाली.

नेरळः येथील पोलिस ठाणे हद्दीतील गंगानगर भागातील रहिवासी चंद्रकांत बोंबे यांची इनोव्हा गाडी अज्ञातांनी जाळल्याची घटना मंगळवारी (ता. 24) रात्री घडली. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे. नेरळमधील ही दुसरी घटना आहे.

चंद्रकांत बोंबे हे मागील काही वर्षांपासून नेरळ पूर्व भागात गंगानगर भागात राहतात. त्यांची इनोव्हा गाडी इमारतीच्या खाली रात्री लावली होती. गाडीला पहाटेच्या सुमारास आग लागल्याचे आजूबाजूच्या रहिवाशांना दिसल्याने आरडाओरड झाला. घरातून खाली येईपर्यंत गाडी जळून खाक झाली. गाडी जळल्याची माहिती नेरळ परिसरात वाऱ्यासारखी पसरली असून, खळबळ उडाली आहे. प्रकाराने नेरळ पोलिस ठाणेही हादरले आहे. यापूर्वी कर्जत-कल्याण रस्त्यावर पायरमाळ भागात रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांची गाडी जाळण्याचा प्रकार घडला होता; मात्र चंद्रकांत बोंबे यांची जाळलेली गाडी ही पूर्णपणे नष्ट झाली असून, नेरळ पोलिसांसमोर या घटनेनंतर मोठे आव्हान उभे राहिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue