रिक्षा-कंटेनर धडकेत तिघे जण जखमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

अपघातात द्रौपदी यांच्या पायाला, वंश याच्या हाताला तसेच राजू यांना गंभीर दुखापत झाली. राजू यांनाही दुखापत झाली.

खालापूरः मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर भरधाव रिक्षाची धडक पुढे चाललेल्या कंटेनरला बसल्याने झालेल्या अपघातात द्रौपदी राजू पवार (वय 60), राजू नागू पवार (60) आणि वंश मनोज पवार (2, रा. महापे) जखमी झाले. द्रौपदी यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

शनिवारी रात्री 10.15च्या सुमारास राजू पवार त्यांच्या ताब्यातील रिक्षा घेऊन खोपोलीहून पनवेलच्या दिशेने निघाले होते. खालापूर हद्दीत रिंकी हॉटेलसमोर कंटेनरचा अंदाज राजू याना न आल्याने अनियंत्रित झालेल्या रिक्षाची धडक कंटेनरला बसली. अपघातात द्रौपदी यांच्या पायाला, वंश याच्या हाताला तसेच राजू यांना गंभीर दुखापत झाली. राजू यांनाही दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच खालापूर पोलिस निरीक्षक विश्‍वजित काईंगडे यांनी घटनास्थळी पोलिस कर्मचारी रवाना केले. अपघातग्रस्त मदत पथकाचे गुरुनाथ साठेलकर आणि विजय भोसले हेही तातडीने रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहचले. जखमींना तातडीने एमजीएम पनवेल येथे उपचाराकरिता दाखल केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue