काशिदचा टेहळणी मनोरा धोकादायक

कािशद समुद्रकिनारी सुरक्षा रक्षकांसाठी उभारण्यात आलेला टेहळणी मनोरा गंजल्याने येथे अपघाताची शक्‍यता आहे.
कािशद समुद्रकिनारी सुरक्षा रक्षकांसाठी उभारण्यात आलेला टेहळणी मनोरा गंजल्याने येथे अपघाताची शक्‍यता आहे.

अलिबाग :  काशिद समुद्रकिनाऱ्यावरील टेहळणी मनोरा जीर्ण झाला असून त्याला गंज लागला आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील टेहळणी मनोरा कधीही कोसळण्याची भीती असून पर्यटकांसह जीवरक्षकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. 

संशयित हालचालींसह, समुद्रकिनारी फिरण्यास येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्‍यात काशिद समुद्रकिनारी टेहळणी मनोरा उभारण्यात आला आहे. या टेहळणी मनोऱ्यावरून जीवरक्षकांच्या मदतीने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी काम करण्यात येते. समुद्राच्या किनारी उभारण्यात आलेला टेहळणी मनोरा खाऱ्या पाण्यामुळे गंजला आहे. या टेहळणी मनोऱ्याचा काही भाग मोडकळीस आला आहे. त्यामुळे या टेहळणी मनोऱ्यावर बसून संशयित हालचालींवर जीवरक्षकांना लक्ष देता येत नाही. हा टेहळणी मनोरा वादळी वाऱ्यासह उधाणामुळे कधीही कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे जीवरक्षक आता किनाऱ्यावरच बसून पर्यटकांच्या सुरक्षेचे काम करत आहेत. 

काशिद समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात पर्यटक फिरण्यासाठी येतात. मात्र समुद्रकिनाऱ्यावर असलेला टेहळणी मनोरा कोसळल्यास येथे जीवितहानी होण्याची शक्‍यता आहे. टेहळणी मनोरा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असून प्रशासनाकडून त्याची अद्यापर्यंत दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे पर्यटकांसह ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. 

याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून समुद्रकिनारी टेहळणी मनोरा उभारण्यात आला आहे. हा टेहळणी मनोरा पूर्णपणे खराब झाला आहे. आपत्ती व्यवस्थापन समितीने या टेहळणी मनोऱ्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी काशीद ग्रामपंचायतीचे सदस्य संतोष राणे यांनी केली आहे.

पर्यटकांच्‍या सुरक्षेचा प्रश्‍‍न ऐरणीवर
 टेहळणी मनोरा खाऱ्या पाण्यामुळे गंजला आहे. या टेहळणी मनोऱ्याचा काही भाग मोडकळीस आला आहे. त्यामुळे या टेहळणी मनोऱ्यावर बसून संशयित हालचालींवर जीवरक्षकांना लक्ष देता येत नाही. त्‍यामुळे पर्यटकांच्‍या सुरक्षेचा प्रश्‍‍न ऐरणीवर आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com