कर्जतमध्‍ये मनसेचा महाआघाडीला पाठिंबा

मनसे जिल्हाप्रमुख जितेंद्र पाटील यांनी पाठिंब्याचे पत्र अशोक भोपतराव यांच्याकडे सादर केले.
मनसे जिल्हाप्रमुख जितेंद्र पाटील यांनी पाठिंब्याचे पत्र अशोक भोपतराव यांच्याकडे सादर केले.

कर्जत : मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असूनही मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. त्यामुळे ते कोणाला पाठिंबा देतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने महाआघाडीचे उमेदवार आमदार सुरेश लाड यांना जाहीर पाठिंबा देत आहोत, असे पत्र राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अशोक भोपतराव यांच्याकडे सादर केले. 

या वेळी जितेंद्र पाटील यांनी युती सरकारच्या कारभारावर घणाघाती टीका केली. तसेच सुरेश लाड हे स्वच्छ चारित्र्याचे व कर्तव्यदक्ष उमेदवार असून सामान्य गोरगरीब जनतेला आधार वाटणारे, अन्यायाशी लढा देणारे व मतदारसंघाचा विकास करणारे उमेदवार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या जमिनीला योग्य भाव देण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात, अशा उमेदवाराचीच या मतदारसंघाला गरज आहे. म्हणूच लाड यांना पाठिंबा दिल्याची भूमिका पाटील यांनी मांडली. 

मनसेच्या पाठिंब्यामुळे कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद वाढली असून आमदार लाड यांना निर्णायक मते मिळण्यास याचा नक्की फायदा होईल, असे मत राष्ट्रवादीचे तानाजी चव्हाण यांनी व्यक्त केले. या वेळी कर्जत तालुकाप्रमुख पप्पू शेळके, पी. सी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण, माजी नगराध्यक्ष शरद लाड, युवती संघटक प्रतीक्षा लाड आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com