मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कंटेनर पेटला

कंटेनरला लागलेली आग विझविताना अग्‍निशमन दलाचे जवान.
कंटेनरला लागलेली आग विझविताना अग्‍निशमन दलाचे जवान.

खालापूर : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहन पेट घेण्याच्या घटना सुरूच असून बुधवारी हळदीची वाहतूक करणाऱ्या कंटेनरने घाटात पेट घेतला. या घटनेत चालक थोडक्‍यात बचावला.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांना आग लागण्याचे सत्र सुरूच असून दोन महिन्यात चार घटना घडल्या आहेत. बुधवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास मुंबईकडे जाणारा कंटेनर खंडाळा सोडल्यानंतर काही मिनिटातच इंजिनातून धूर आल्याने चालकाने कंटेनर मार्गिकेजवळ उभा केला. काही वेळातच धूराच्या जागी आगीच्या ज्वाळा येवू लागल्या. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. 

या घटनेची माहिती मिळताच रोडवेज पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, बोरघाट वाहतूक पोलिस, खोपोली पालिकेची अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी पोहचली. सुमारे अर्ध्या तासाने आग आटोक्‍यात आली. या घटनेत कंटेनरची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली असून ट्रकचालक थोडक्‍यात बचावला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com