जिल्ह्यात डिसेंबरमध्ये पुन्हा रणधुमाळी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

अलिबाग : 14 डिसेंबर 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या रायगड जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींची सार्वत्रिक; तर 142 ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक डिसेंबरमध्ये होण्याची शक्‍यता आहे. 

जिल्ह्यातील महाड तालुक्‍यातील मुमुर्शी, भोमजई, पिंपळकोंड; तर कर्जत तालुक्‍यातील तिवरे व वरईतर्फे निड या पाच ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबर ते मार्चमध्ये संपणार आहे. या 5 ग्रामपंचायती सार्वत्रिक; तर अन्य 142 ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक डिसेंबरमध्ये होणार आहे. पोटनिवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये 14 सरपंच व 223 सदस्यपदांची निवडणूक होणार आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींचा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

1 नोव्हेंबरला प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतर 5 नोव्हेंबरपर्यंत त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यात येणार आहेत. 6 नोव्हेंबरला प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ही प्रक्रिया आठ दिवसांत राबविण्यात येणार असून तालुका तहसीलदार यांना सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार कामेही सुरू झाली आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue