कोट्यवधींच्‍या वीजबिलाची थकबाकी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

अलिबाग : नियमित वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांमुळे विद्युत वितरण कंपनीच्या वीज सेवेवर परिणाम होत आहे. थकीत वीज बिलामुळे विद्युत वितरण कंपनीला आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. अलिबाग व पेण या दोन तालुक्‍यांतील सात हजार ३०८ ग्राहकांकडून तीन कोटी १ लाख ९३ हजार १०९ रुपयांचे वीजबिल थकले आहे. त्यामध्ये अलिबाग तालुक्‍यातील एक कोटी ८९ लाख ६१ हजार ६९ रुपये, तर पेण तालुक्‍यातील एक कोटी १२ लाख ३२ हजार ४० रुपयांचा समावेश आहे.  

रायगड जिल्ह्यातील अलिबाग व पेण तालुक्‍यात एकूण एक लाख ४९ हजार ७२३ विद्युत ग्राहक आहेत. या ग्राहकांना विद्युत वितरण कंपनीकडून सेवा देण्याचे काम आहे. अलिबाग विभागात येणाऱ्या दोन तालुक्‍यांमध्ये अलिबाग एक व अलिबाग दोन व पेण यांचा समावेश आहे. 

या विभागांमध्ये चौल एक, चौल दोन, नागाव एक, नागाव दोन, फणसापूर, रामराज, रेवदंडा एक, रेवदंडा दोन, वरसोली, चोंढी, हाशिवरे, किहीम, कुसुंबळे, मांडवा, पोयनाड, रेवस, सासवणे, थळ, हमरापूर, जिते, पांडापूर, पेण एक, पेण दोन, पेण ग्रामीण, वडखळ, वाशी या विभागाचा समावेश आहे. या विभागाद्वारे विद्युत सेवा पोहचविण्याचे काम केले जाते. 

वीज भरण्यासाठी आधुनिक पद्धत सुरू केली असतानाही वीजबिल थकबाकीदांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या वीजबिल थकबाकीरांमुळे वीज सेवेवर परिणाम होऊ लागला आहे. अलिबाग व पेण या दोन तालुक्‍यांतील सात हजार ३०८ ग्राहकांकडून तीन कोटी १ लाख ९३ हजार १०९ रुपयांचे वीजबिल थकल्‍याची माहिती विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

ग्राहकांकडून वीजबिल नियमित भरण्यात येत नाही. त्याचा विपरीत परिणाम वीज सेवेवर होत आहे. या विभागातील विद्युत ग्राहकांनी तातडीने विजेचे बिल भरावे, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
- माणिकलाल तपासे, कार्यकारी अभियंता, विभागीय कार्यालय, अलिबाग. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue