रायगड जिल्ह्यात क्रीडा संकुलांशीच "खेळ' 

सकाळ वृत्तसेवा
05.01 AM

अलिबाग : रायगड जिल्ह्यात क्रीडा धोरणाला हरताळ फासण्याचे काम सातत्याने केले जात आहे. प्रत्येक तालुक्‍यात एक क्रीडा संकुल असावे, असे सरकारचे धोरण आहे; मात्र रायगड जिल्ह्यात चार तालुक्‍यांमध्ये सरकारला अद्यापही जागा मिळालेली नाही. जी 11 क्रीडा संकुले पूर्ण झालेली आहेत, त्यांच्याही डागडुजीसाठी साधारण एक कोटी रुपयांची आवश्‍यकता असताना केवळ 15 लाख रुपयांचा निधी सरकारने जिल्ह्यासाठी मंजूर केला आहेत. हा निधी पाच क्रीडा संकुलांसाठी वापरला जाणार आहे. 

राज्य युवा संचालनालयाने या क्रीडा संकुलांच्या देखभाल दुरुस्तीसाठी 15 लाख 84 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातून दुरवस्था झालेल्या माणगाव, पेण, तळा, रोहा, पनवेल, सुधागड या तालुक्‍यांतील क्रीडा संकुलांना हा निधी वापरला जाणार आहे. "तालुका तिथे क्रीडा संकुल' असे धोरण राज्य सरकारने स्वीकारल्यानंतर रायगड जिल्ह्यात 11 तालुका क्रीडा संकुलांची उभारणी करण्यात आली आहे. यातील सहा क्रीडा संकुलांची नियमित दुरुस्ती, धावपट्टीची निगा, इनडोअर स्टेडिमयची दुरुस्ती, कामगारांचा पगार यासाठी हा मंजूर झालेला निधी वापरला जाणार आहे. 

चार तालुक्‍यांत जागा मिळेना! 
मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर असलेल्या रायगड जिल्ह्यात केवळ 11 तालुका क्रीडा संकुलांची कामे पूर्ण झालेली आहेत. सरकारला चार तालुक्‍यात अद्याप जागाच मिळालेली नाही. अलिबाग, मुरूड, पोलादपूर आणि कर्जत तालुक्‍यांचा समावेश आहे; तर महाड, रोहा, श्रीवर्धन, म्हसळा, खालापूर, पनवेल, सुधागड या तालुक्‍यात क्रीडा संकुलांची कामे संथगतीने सुरू आहेत. तळा, पेण, माणगाव आणि रोहा या चारच तालुक्‍यांतील क्रीडा संकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. 

नियमित डागडुजी, दुरुस्ती आणि कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी हा निधी खर्च करावा लागणार आहे. यातून क्रीडा संकुलात काहीही सुधारणा करणे शक्‍य होणार नाही. रखडलेल्या क्रीडा संकुलांसाठी योग्य जागा निवडण्याचे काम सुरू आहे. 
- अंकिता मयेकर, प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue